अन प्रार्थना फाउंडेशन मधील वंचित मुलांसाठी सुरू झाले फिरते वाचनालय.....

प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेल्या वंचितांच्या शाळेतील मुलांसाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हस्, पुणे यांच्या वतीने फिरते वाचनालय सुरू करण्यात आले.

      आज कित्तेक मुले शिक्षण सोडून रस्त्यावर भिक्षा मागता दिसतात,कित्तेक मुलांना शिक्षणाची आवड असून सुद्धा योग्य मार्गदर्शन न भेटल्याने त्यांना शिक्षण घेता येत नाही,कित्तेक मुलं पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडिलांसोबत स्थलांतर करता,शिक्षण सोडून भटकत रहातात,वड्या वस्त्यांवर पाल टाकून राहतात....अशाच भिक्षा मागणाऱ्या,वंचित,निराधार मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून वंचितांची शाळा- एक पाऊल प्रगती कडे हा प्रकल्प चालवला जातो.सोलापूर शहरातील विविध भागात जवळपास 300 मुलांसाठी हा प्रकल्प चालवला जातो.
    या मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,मुलांना वाचनासाठी मुबलक व योग्य पुस्तक उपलब्ध व्हावी या हेतून प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेल्या  आरटीओ कार्यालयाच्या जवळील शाळेत सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हस्, पुणे यांनी प्रथम बुक च्या पुस्तकांचे सेट देऊन  फिरते वाचनालय सुरू करण्यात आले. या फिरत्या वाचनालयाचे उद्घाटन सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हस्, पुणेचे अमोल उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आले.
     या फिरत्या वाचनालयात उपयोग शहरातील इतर वंचित निराधार भिक्षा मागणाऱ्या,स्थलांतरीत मुलांना वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी होणार आहे.
   या वेळी प्रार्थना फाऊंडेशन चे प्रसाद मोहिते,मल्ले तेली,भाग्योदय इपोळे, तानाजी तेली,रवी संकुल उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog