मोप ग्रामपंचायत चा अक्रोश पदयात्रेस पाठिंबा

 _वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे_ 
       _सरपंच 
    ॲड.भागवत नरवाडे यांचे शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे अवाहन_ 
      भूमिपुत्र शेतकरी संघटनांकडून 31 डिसेंबर ला रिसोड ते वाशिम शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पदयात्रा काढली जात आहे. या पद यात्रेस पाठींबा देण्यासाठी व सहभाग नोंदवण्यासाठी मोप येथिल सरपंच अॅड भागवत नरवाडे उपसरपंच काळे व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी रिसोड स्थीत भुमीपुत्र कार्यालयात जाऊन भुमीपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांची भेट घेतली व अक्रोश पदयात्रेत सहभागी होत पाठिंबा दिला. भूमिपुत्र कडुन मोप ग्रामपंचायत व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजुपाटील डांगे, गजानन सदार, रामेश्वर सदार, रवि जाधव यांच्यासह भूमिपुत्र चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अन प्रार्थना फाउंडेशन मधील वंचित मुलांसाठी सुरू झाले फिरते वाचनालय.....