जन्मो जन्मी हाच पती मिळावा म्हणून महिलांनी. केली प्रार्थना.......
आज इंदापूर शहरामध्ये वटपौर्णिमा हा सण मोठ्या आनंदामध्ये , थाटामाटाने सुवासिनी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून साजरा केला.
भारतीय संस्कृती मध्ये अनेक सण साजरे केले जातात, यामध्ये महिलांसाठी आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा, ज्येष्ठ महिन्यांमध्ये साजरा होणारा वटपौर्णिमा हा सण आहे.या सणाचे महत्व खूप मोठे आहे भारतीय संस्कृतीमध्ये वाढलेली प्रत्येक विवाहित महिला आपल्या सुखी संसारासाठी तसेच आपल्या कुटुंबावर कोणाची वाईट दृष्टी पडू नये म्हणून तसेच आपल्या घरधन्याचे आयुष्य वाढू दे व सात जन्माची गाठ अशीच राहू दे अशी प्रार्थना यावेळी उपस्थित महिला वडाच्या झाडाला सात फेरे घेऊन करतात. या सणा दिवशी विवाहित महिला सुंदर अशी वेशभूषा परिधान करून देव-देवतांची प्रार्थना करतात. या दिवशी महिला उपवास करतात,हा सण संपूर्ण आहे भारतामध्ये साजरा करण्यात येतो या सणाला घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. महिला एकमेकींना सुहासिनीचा वान देऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने करतात......
....माय मराठी न्यूज साठी इंदापूर हून धनश्री गवळी......
Comments
Post a Comment