आमदार भरणे मामा कबड्डी पण नंबर वन.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....
एल.जी बनसोडे ,इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पळसदेव, येथे तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सन 2022 23 अंतर्गत वयोगट 14 ते 19 वर्ष मुले व मुली आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तसेच खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या खासदार फंडातून उभारलेल्या नवीन इमारतीचे लोकार्पण आमदार भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उद्घाटन झाल्यानंतर कबड्डी स्पर्धेमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी सहभागी होऊन कबड्डीचा खेळ खेळला यावेळी कबड्डी खेळत असताना दोन गडी बाद ही केले यावेळी सर्व मुला-मुलींना प्रोत्साहन म्हणून आमदार भरणे हे स्वतः राजकीय मैदानात रोजच खेळत असतात आज मुलांबरोबर कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत नाना बनसोडे उपाध्यक्ष डॉक्टर शितल कुमार शहा कार्याध्यक्ष नंदाताई बनसोडे पंचायत समिती सदस्य प्रदीप काळे पळसदेव चे सरपंच इंद्रायणी मोरे उपसरपंच कैलास भोसले तसेच आजी-माजी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment