उद्या पुण्यामध्ये होणार धक्का मारो आंदोलन
उद्या पुण्यामध्ये होणार धक्का मारो आंदोलन......
बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडी यांच्या वतीने उद्या पुण्यात कलेक्टर ऑफिस समोर धक्का मारो आंदोलन होणार आहे असे आज दिनांक 14 /6 /2019 रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी प्रमुख मागण्या पेट्रोल डिझेल गॅस यांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती कमी करा ,खाद्यतेल तसेच जीवनावश्यक वस्तू खाद्यपदार्थांचे भाव कमी करा ,वीज बिल माफ करा , या मागण्यांसाठी उद्या कलेक्टर ऑफिस समोर संविधानिक मार्गाने सकाळी अकरा वाजता आंदोलन होणार आहे हे आंदोलन रिक्षा ,मोटर सायकल, चार चाकी वाहन, यांना धक्का मारो अशाप्रकारे होणार आहे या कार्यक्रमास जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा असे आव्हान करण्यात आले . यावेळी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अमोल लोंढे, पुणे शहर युवा अध्यक्ष शतायु भगळे, पुणे शहर महिला अध्यक्ष वैशालीताई राक्षे, हवेली तालुका युवा अध्यक्ष विशाल पेटकर, तसेच लहुजी क्रांती मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब राखपसरे, यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला, तसेच यावेळी इतरही कार्यकर्ते उपस्थित होते......
Comments
Post a Comment