इंदापूर प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल
डाळज नंबर 1 गावच्या हद्दीत पहाटे अपघात घडून इंदापूर येथील परिमल अरुण मस्तूद वय 30 यांचे काल अपघाती निधन झाले होते. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी मस्तूद कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देवो अशी यावेळी त्यांनी प्रार्थना केली.
रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याने परिसरातील स्थानिक नागरिकांनी यावेळी हळहळ व्यक्त केली.
Comments
Post a Comment