इंदापूर नाभिक बांधव काळी फीत लावून निषेध करणार.....
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी वापरले नाभिक समाजाबद्दल अपशब्द.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.
केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील चर्चासत्रात राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना तिरुपती बालाजी येथील नाव्ही समाजाची उपमा देऊन नाभिक समाजाचा हा अपमान केला आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्यामध्ये समस्त नाभिक बांधवांनी निषेध नोंदवला आहे.
नाभिक समाजाबद्दल वापरलेले अपशब्द हा समस्त नाभिक बांधवांचा अपमान आहे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक बांधवांची बिनशर्त माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रातील संपूर्ण नाभिक बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहे याचाच एक भाग म्हणून इंदापूर मधील समाज काळी फीत लावून केंद्रीय मंत्री दानवे यांचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे असे इंदापूर तालुका नाभिक महामंडळाचे निरीक्षक दादा साळुंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रमेश राऊत, इंदापूर तालुका नाभिक महामंडळाचे अध्यक्ष अवधूत पवार, इंदापूर शहर नाभिक महामंडळाचे अध्यक्ष संतोष क्षीरसागर तसेच इतर नाभिक बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment