इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल...
आदर्श बालक मंदिर सोलापूर या शाळेचा राज्यस्तरीय शिकू आनंदे या उपक्रमात एरोबिक्स नृत्य स्पर्धेमध्ये सादरीकरण .
दिनांक एकोणीस मार्च दोन हजार बावीस 20 रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे आयोजित शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमात सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श बालक मंदिर मोदी येथील प्राथमिक शिक्षक श्री जनार्दन प्रभाकर वाघमारे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी दीक्षा कुणशीकर, मेरी मेहेत्रे, वैष्णवी विटेकर, प्रतीक्षा बुधुर, यांच्यासह सहभागी झाले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कोविड काळात कृती प्रवण, ठेवून त्यांचे शिक्षण चालू ठेवल्याबद्दल आदरणीय शिक्षण संचालक श्री एम देवेकर सिंह साहेब यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम सुरु झाला आहे . माननीय श्री दिनकर टेमकर साहेब व माननीय श्री रमाकांत काटमोरे तसेच माननीय सौ डॉक्टर नेहा बेलसरे माननीय श्री विकास गरड तसेच डॉक्टर कमलादेवी आवटे तसेच कला क्रीडा व सामाजिक शास्त्र व उपविभाग प्रमुख माननीय श्री सचिन चव्हाण उप अधिव्याख्याता माननीय संज्योती रजपूत या कार्यक्रमाचे राज्य समन्वयक श्री विक्रम अडसूळ सौ ज्योती बेलसरे यांच्या माध्यमातून 19 मार्च रोजी शिकू आनंदे या उपक्रमाचा 37 वा भाग सादर करण्यात आला यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील श्री जनार्दन प्रभाकर वाघमारे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी संगीताच्या या तालावर एरोबिक्स या व्यायाम प्रकाराचा भाग अतिशय उत्कृष्टरित्या सादर केला. शिकू आनंदे च्या या भागात आदिवासी सी बांधवांचे प्रसिद्ध होळी नृत्य, नैसर्गिक रंगनिर्मिती, सुमधुर होळी गीत गायन आणि Fun Time,Quiz Time आदर करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्र सह ग्लोबल नगरी फाउंडेशन अमेरिका या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून 47 देशांमध्ये कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
या यशस्वी सहभागाबद्दल श्री जनार्दन प्रभाकर वाघमारे व त्यांच्या विद्यार्थिनी यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री डॉक्टर किरण लोहार साहेब, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूरचे प्रशासन सोलापूरचे प्रशासन अधिकारी अधिकारी आदरणीय श्री संजय जावीर साहेब, डायट चे प्राचार्य श्री रामचंद्र कोरडे साहेब पर्यवेक्षक श्री संतोष बुलबुले साहेब संस्था सचिव माननीय श्री अरुण गायकवाड साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा, सौ सुनीता गायकवाड मॅडम मुख्याध्यापिका श्रीमती निकहत शेख मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व पालक वर्ग यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment