हर्षवर्धन पाटील साहेब ,हम आपके साथ है......
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल..
निष्ठेचे प्रतीक म्हणून विठ्ठलाची मूर्ती दिली भेट....
इंदापूर तालुक्यातील शेकडो युवक अचानक उपस्थित.....
साहेब ,हम आपके साथ है.....
इंदापूर येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भाग्यश्री बंगला येथे रविवारी ( दि.3) सकाळी अचानकपणे तालुक्यातील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन आपले समर्थन व्यक्त केले. यावेळी युवकांनी हर्षवर्धन पाटील यांना निष्ठेचे प्रतीक म्हणून विठ्ठलाची मूर्ती भेट दिली. यावेळी या युवकांनी तुम्हीच आमच्यासाठी राजकारणातील विठ्ठल आहात, आम्ही तुमची आयुष्यभर साथ सोडणार नाही असे वचन दिले. याप्रसंगी वातावरण काहीसे भावनिक बनले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील शेकडो युवकांनी अचानकपणे येऊन दिलेल्या नि:स्वार्थी समर्थनाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी
इंदापूर येथे भाजप नेते , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांनी भेट देऊन विठ्ठलाची मूर्ती भेट दिली...
Comments
Post a Comment