राजवर्धन पाटील यांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत, शीरखुर्माचा घेतला आस्वाद .......
इंदापूर तालुका प्रतिनिधी .. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी काल दि. 3 मे रोजी इंदापूर शहरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्यासमवेत शीरखुर्माचा आस्वाद घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला.
राजवर्धन पाटील यांचे युवकांनी उत्स्फूर्त स्वागत केले तसेच त्यांच्या समवेत फोटो काढून सोशल माध्यमाद्वारे प्रसिद्धी केली.
ईद हा सण मुस्लिम बांधवांचा आनंद द्विगुणीत करणारा असून उत्साह वाढविणारा, सामाजिक एकतेचे दर्शन देणारा हा सण असल्याची प्रतिक्रिया यावेळी राजवर्धन पाटील यांनी दिली.
Comments
Post a Comment