रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.....
आमदार दत्तात्रय भरणे
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल......
नव उदय चव्हाण एज्युकेशन ट्रस्ट व ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमाने कुरवली ता. इंदापूर येथे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नितीन चव्हाण व विश्वस्त डॉ. नम्रता चव्हाण यांनी गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर,छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक दत्तात्रय सपकळ, तालुका राष्ट्रवादी माजी उपाध्यक्ष सत्यवान चव्हाण, रवींद्र कदम , ,बापूराव पांढरे,विठ्ठल फडतरे, विजय पांढरे ,दिलीप पांढरे,सुरेश चव्हाण,रावसाहेब चव्हाण, आयुब सय्यद,भानुदास चव्हाण,अरुण चव्हाण,राहुल चव्हाण,विजय चव्हाण,भीमराव दणाणे ,शंकर थोरात इ मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment