बार्शीकरांचा हात बार्शीकरांच्या मदतीसाठी!
#भगवंत_आरमार...!
आजच आपली नोंदणी करा...
जय हिंद! 🙏🏻
भगवंत नगरी मधील युवक, युवती, महिला, पुरुष यांच्यासाठी समाजकार्याची सुवर्णसंधी!
एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ!
हेच ब्रीद समोर ठेवून, आपल्या परिसरातील #आणीबाणीच्या काळामध्ये संकट समयी, म्हणजेच... पूरग्रस्त वातावरण, भीषण अपघात, अचानक लागलेली आग, शेतकऱ्यांची संकटे, औद्योगिक वसाहतीमधील आपत्कालीन संकटे, वसाहतींची पडझड, नैसर्गिक आपत्ती, सर्पमित्र, प्राथमिक उपचार, #आत्महत्या तसेच अचानक आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी, आपल्या लोकांवर ओढवलेल्या संकटाचा सामना करून, त्यातून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपण "#भगवंत_आरमार" या संघटनेची स्थापना करत आहोत.
या संघटनेमध्ये सामील होण्यासाठी एकच अट असेल, ती म्हणजे निस्वार्थिनी, निधर्मी, निपक्षपाती भावनेने #समाजकार्य करण्याची आवड.
चला तर मग आपल्या बंधू-भगिनींच्या #रक्षणासाठी तत्पर रहा!
बैठकीचे आयोजन :-
ठिकाण :- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जवाहर कंपाऊंड, बार्शी.
दिनांक :- शुक्रवार, 07/07/2023
वेळ :- सायंकाळी ठीक 07:00 वाजता.
संपर्क :- 9922914009
9922914209
जय हिंद! 🙏🏻
Comments
Post a Comment