हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गौरी पूजन व महानैवेद्य 
इंदापूर : प्रतिनिधी.. धनश्री गवळी 

         माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या निवासस्थानी माहेरवाशीण जेष्ठा गौरीच्या आगमनाच्या दुसर्‍या दिवशी गौरी-गणपती पूजन व महानैवेद्याचा विधी महिला व नागरिकांच्या गर्दीत शुक्रवारी (दि.22) सायंकाळी उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला. 
       हर्षवर्धन पाटील यांचे घरी परंपरेनुसार गौरी गणपतीचा सण हा प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी भाग्यश्री बंगलो येथे महिला व नागरिकांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुका जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी स्वागत केले व आपुलकीने संवाद साधला. यावेळी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील या उभयतांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. भाग्यश्री बंगलो येथे ज्येष्ठा गौराईची अतिशय आकर्षक अशी सजावट इंदापूर तालुका जिजाऊ महिला फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.  यानिमित्ताने निवासस्थानी आलेल्या महिला व नागरिकांनी गौरी-गणपतीचे दर्शन व महानैवेद्य घेतला. याप्रसंगी निहारजी ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे व मान्यवर उपस्थित होते. गौरी-गणपती दर्शना निमित्ताने शुक्रवारी सायंकाळपासून भाग्यश्री बंगलो गर्दीने फुलून गेला होता.

Comments

Popular posts from this blog

अन प्रार्थना फाउंडेशन मधील वंचित मुलांसाठी सुरू झाले फिरते वाचनालय.....

सिल्व्हर मध्ये रंगला सिल्व्हर ज्युबिली सोहळा