खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याकडून दसरा मेळावा साठी विशेष रेल्वे चे आयोजन....
(प्रतिनिधी :-) दरवर्षीप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन जाण्यासाठी " स्पेशल तुळजाभवानी एक्सप्रेस" चे आयोजन केले आहे...
सदर रेल्वे दिनांक 23 ऑक्टोबर 23 रोजी सायंकाळी 10.30 वाजता धाराशिव मधून मुंबई कडे प्रस्थान करणार असून या रेल्वेत
उमरगा, लोहारा, कळंब, धाराशिव, तुळजापूर,वाशी, औसा आणि निलंगा तालुक्यातील शिवसैनिकांनी धाराशिव येथे उपस्थित रहावे तर भूम, परंडा आणि बार्शी तालुक्यातील शिवसैनिकांनी 11 वाजता बार्शी रेल्वे स्थानकावरून रवाना व्हावे या रेल्वे प्रवासात, खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील,शंकरराव बोरकर, माजी आ. दिनकर माने,नंदूराजे निंबाळकर,संतोष सोमवंशी,जेष्ठ नेते बाबा पाटील,रणजित पाटील, अक्षय ढोबळे, बार्शी तालुकाप्रमुख प्रवीण काकडे आदी उपस्थित असणार आहेत
Comments
Post a Comment