तेज पृथ्वी ग्रुप इंदापूर यांनी केला कर्तुत्वान महिलांचा सन्मान......
इंदापूर/धनश्री गवळी.

तेज पृथ्वी ग्रुप इंदापूर यांच्या वतीने पंचायत समिती इंदापूर येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
    कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून केली. यावेळी कार्यक्रमास मान्यवर म्हणून राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे, म्हणून राहुल मखरे,बि,एम,पी, मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर, पांडुरंगाच्या मारकड, उपसभापती इंदापूर, महेंद्र दादा रेडके, तसेच सिने अभिनेत्रीम् मिताळी कोळी, अपेक्षा  पांचाळ हे उपस्थित होते. 
    महिलांनी चूल आणि मुल एवढेच न पाहता समाजामध्ये वावरत असताना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून,  सामाजिक, शैक्षणिक, राजनीतिक, क्रीडा कला , तसेच नोकरीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर राहून आपली जबाबदारी पार पाडत आहेत, अशा महिलांचा सन्मान करणे हे महत्त्वाचे आहे असे तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा सौ अनिता खरात यांना वाटले म्हणूनच या महिलाचा सन्मान करण्याचा योग मला आला असे त्यांनी सांगितले. 
  यावेळी रेश्मा ताई घनश्याम हाके हडपसर, अनुष्का ताईभरणे, भरणेवाडी. जयश्री गटकुळ कालठन नंबर एक, अमृता भोईटे बारामती, मनीषाताई मखरे इंदापूर,खैरूनिसा शेख इंदापूर, डॉक्टरअश्विनी ठोंबरे इंदापूर,इंदु घनवट पिंपरी चिंचवड, चित्रलेखा ढोले लाखेवाडी, या नऊ महिलांचा महिलांचा सन्मान करण्यात आला.तसेच
   विशेष सन्मान व मानपत्र देऊन सौ,अरुणा सर्जेराव कवडे सहशिक्षिका श्री हनुमान विद्यालय अवसरी,अंकीता शहा माजी नगराध्यक्ष इंदापूर ,
 रुक्मिणी गलांडे असिस्टंट, पोलीस कमिशनर  पुणे,मनिषा अरुण आरडक (वच्चे) उपशिक्षिका, जाधव वस्ती इंदापूर, माधुरी लडकत इंदापूर  महिला पोलिस यांचा सन्मान हार शाल,नारळ , ट्रॉफी देऊन सभागृहात करण्यात आला.यावेळी गणेश शिंगाडे, सद्दाम बागवान,विजय पवार, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अन प्रार्थना फाउंडेशन मधील वंचित मुलांसाठी सुरू झाले फिरते वाचनालय.....