रिसोड तालुक्यातील गुरा -ढोरांना जंत व गोचिड नाशक औषधाचे वाटप

 वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे

          रिसोड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी -२ चिखली, कार्यक्षेत्रातील हराळ येथे गायी, बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांना पोटातील जंत निर्मुलनासाठी जंतनाशक औषधी पाजणे, व बाह्य परोपजीवीच्या प्रतिबंधासाठी गोचीड नाशक औषधीचे वाटप करण्यात आले.

          पाळीव जनावरांना जंत व गोचीडापासून इजा पोहोचते व अनेक मार्गांनी आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरते. जंत व गोचीड प्रत्यक्षरीत्या जनावरांना अति त्रास, दुःखदायक चावे, रक्त शोषण, जखमा करीत असतात. त्याचप्रमाणे इतर अवयवांना आजार आणि पेशीजालात संक्रमण करुन, त्यांच्या शरीरामध्ये सांसर्गिक रोगजंतूंचा प्रसार अथवा रोग प्रसारास मदतीची स्थिती निर्माण करीत असतात. याबाबत पशुपालकामध्ये जनजागृती करण्यात आली. जनावरांच्या गोठ्यात प्रत्यक्ष जावून जंतनाशक औषधी पाजणे, व आजारी जनावरांची तपासणी करून उपचारही करण्यात आले. डास, चिलटे, मच्छर, व माशा निर्मुलनासाठी गोठ्यात फवारणी करीताही औषध देण्यात आले.

          गावातील पशुपालकांनी गायी, बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांना गोचीड नाशक औषधी घेऊन केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सदर मार्गदर्शन पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी -२ चिखलीचे पशुधन पर्यवेक्षक, डॉ. सतीश खरात यांनी केले. तर डॉ. वाकळे, विष्णू सरकटे, संदिप सरकटे, संतोष बुरशे, बालाजी बिल्लारी, विजय सरकटे, राजू खैरे, बाबुराव सरकटे, रामदास सरकटे, आपटे, महेश बिल्लारी, यांच्यासह गावातील पशुपालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अन प्रार्थना फाउंडेशन मधील वंचित मुलांसाठी सुरू झाले फिरते वाचनालय.....