व्याड चिखली रस्त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्तारोको आंदोलन.
वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे

वाशिम:- आज दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी मौजे व्याड ते चिखली फाटा या नादुरुस्त असलेल्या रस्ता संदर्भात वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने दि 26/10/2023 रोजी मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आज पर्यंत यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. किंवा या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. म्हणून आज सोमवार दिनांक 06/11/2023 रोजी दुपारी 3.00 वाजता व्याड फाटा रिसोड रोड चिखली येथे वंचित बहुजन आघाडी वाशीमच्या जिल्हाध्यक्ष सौ किरणताई गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. या वेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष किरणताई गिर्हे यांनी जोपर्यंत हा रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करत राहु. त्याअगोदर दिवाळीपूर्वी याची तात्पुरती डागडुजी करून सदर ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी करून तत्कालीन लोक प्रतिनिधी बद्दल रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी सोनाजी इंगळे, ज्योतीताई इंगळे, भास्कर गायकवाड, निंबाजी सबरदंडे, सय्यद अकिल यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक बांधकाम रिसोड  कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता श्री देशमुख या ठिकाणी आल्यावर रास्तरिको आंदोलनाची सांगता झाली. या आंदोलनाचे सूत्रसंचालन विनोद अंभोरे आणि प्रास्ताविक गिरीधर शेजुळ तर आभार प्रदर्शन गोपाल पारिस्कर यांनी केले. यावेळी पोलीस प्रशासनाचे योग्य ते सहकार्य लाभले. या रास्तरिको आंदोलनाला जिल्हाध्यक्ष सौ किरणताई गिर्हे, जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे, जिल्हा मार्गदर्शक भास्करराव गायकवाड, नारायणराव मिटकरी, जिल्हा उपाध्यक्ष गिरीधर शेजुळ, विधी सल्लागार ऍड हिरामण मोरे, जिल्हा सचिव उत्तमराव झगडे, तालुका अध्यक्ष सय्यद अकिल, युवा आघाडी तालुका अध्यक्ष गोपालभाऊ पारिस्कर, रिसोड शहर अध्यक्ष प्रदीप खंडारे, युवा आघाडी शहर अध्यक्ष सदानंद गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सतीश लड्डा, वाशिम तालुका उपाध्यक्ष केशव उचित, निंबाजी सबरदंडे,  राहुल मैनकर, तोषिफ शेख, कवठा सर्कल अध्यक्ष केशव अंभोरे, महासचिव अशोक पडघाण गोवर्धन सर्कल अध्यक्ष विनोद अंभोरे, गोभणी सर्कल अध्यक्ष, अंकुश टोंचर, सर्कल उपाध्यक्ष मदन चतुर, सम्मेक आंदोलनाचे नागसेन धांडे, कुलदीप पंडित, प्रताब लाड, नारायण सपकाळ, तालुक्यातील शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अन प्रार्थना फाउंडेशन मधील वंचित मुलांसाठी सुरू झाले फिरते वाचनालय.....