मळेगांव येथे नर्मदेश्वर अन्नपुर्णा योजनेचा शुभारंभ
मळेगाव ता.बार्शी येथे गावचे ग्रामदैवत नर्मदेश्वर नागनाथ महाराज यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या नर्मदेश्वर अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ सोशल डिस्ट्नसिंग चे पालन करून श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष अंकुश माळी व माजी सरपंच सिद्धेश्वर मुंबरे,यांच्या शुभहस्ते करण्यात आला,या योजनेच्या माध्यमातून मळेगावतील वीस ते तीस गरजू व निराधार लोकांना दोन वेळचे जेवण मोफत उपलब्ध होणार आहे, सध्य कोरोना या विषाणूजन्य रोगाचे संपूर्ण देशावर संकट ओढवलेले आहे,त्यामुळे या रोगाच्या भीतीमुळे नागरिक घराच्या बाहेर येण्यासाठी भीत आहेत त्यामुळे ज्यांचे पोट दुसऱ्यावर अवलंबून होते आशा निराधार व्यक्तीचे भरपूर हाल होत आहेत,परंतु या अन्नपूर्ण योजनेमुळे हे हाल आत्ता होणार नाहीत त्यामुळे ही अन्नपूर्णा योजना कायम स्वरूपाची करण्याचे ठरवण्यात आले,या योजनेसाठी गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी एकत्रित येऊन हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला व आपण कमावलेल्या रक्कमेतील काही रक्कम या योजनेमध्ये टाकण्याचे मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत ठरले,भविष्यकाळात शिवाजी तरुण मंडळाच्या माध्यमातून ही अन्नपूर्ण योजना शेजारील गावातील निराधार व्यक्तीसाठी ही चालू करण्याचा मानस आहे,या पूर्वीही श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या माध्यमातून अनेक सामजिक व आध्यात्मिक असे चांगले उपक्रम राबविण्यात आले आहेत, या सामजिक जाणिवेतून सुरू करण्यात आलेल्या अन्नपूर्णा योजनेच्या शुभारभासाठी श्री शिवाजी तरुण मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी,अध्यक्ष अंकुश माळी,मळेगावचे सरपंच गुणवंत मुढे,माजी सरपंच सिद्धेश्वर मुंबरे,यशदाचे शिवाजीराव पवार,बी,जे शिर्के चे भोलानाथ देवकते,माजी उपसरपंच निजाम शेख,तंटा मुक्त समितीचे माजी अध्यक्ष रामहरी गाडे,गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी,माजी सैनिक आजीनाथ गाडे,रामलीग पाडुळे,मंडळाचे संजय माळी,ग्रा.प.सदस्य संदीप विटकर,प्रा.संजय माळी,उद्दोजक शंकर विटकर,ग्राहक सेवा समितीचे युवक अध्यक्ष अशोक माळी,आकबर शेख,दशरथ इंगोले,संतोष नलावडे,यशवंत गाडे,खाजानूर कोतवाल, व लाभार्थी यावेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment