ईर्ले येथे माजी न्यायमुर्ती बी.एन.देशमुख यांना श्रध्दांजली


वैराग (प्रतिनिधी) निगर्वी न्यायमुर्ती ,व्यासंगी अभ्यासक ,सजग संसदपटू ,निस्पृह कार्यकर्ते ,गोरगरिबांचे वकील ,विचारवंत आणि वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले बलभीमराव नरसिंगराव देशमुख अर्थात माजी न्यायमूर्ती बी . एन .देशमुख यांना इर्ले तालुका बार्शी येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
   माजी खासदार उद्धवराव पाटील यांचे भाचे असलेले माजी न्यायमूर्ती बी .एन .देशमुख हे इर्लेचे भाचे होते . त्यामुळे त्यांचा इर्लेगाव शी जवळचा संपर्क होता. बी. एन. देशमुख यांचे औरंगाबाद येथे नुकतेच निधन झाले . इर्ले येथे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी पत्रकार आनंदकुमार डुरे यांनी बी. एन. देशमुख तथा तात्यासाहेब यांच्या कार्याची माहिती आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात उपस्थितांना दिली.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पाटील ,रमेश पाटील , सागर पाणीवाटप संस्थेचे चेअरमन राजाभाऊ डुरे, सरपंच साहेबराव आडगळे ,सुधीर डुरे सुरेश डुरे, संजय सुरवसे, दिपक जगदाळे, दत्तात्रय पाटील ,दत्तात्रय मगर, बाळासाहेब शिंदे, विलास डुरे, काका गायकवाड, अशोक जगदाळे ,आबादेव डुरे, सिध्देश्वर वायकुळे ,दादा पवार ,चंद्रकांत डुरे युवराज डुरे, दिलीप चव्हाण, कृष्णाथ काकडे ,नानासाहेब डुरे, हनुमंत डुरे, विठ्ठल कापसे, अतुल फरतडे ,मुकूंद पाटील,  साहेबराव नाईकवाडी, बाबासाहेब डुरे अभिजित पाटील, किरण पाटील,
 रमेश डुरे , संतोष पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog