हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम

प्रतिनिधि, गणेश तौर, हवेली, पुणे

पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर फाटा ते कवडीपाट टोलनाका या परिसरात महामार्गाच्या कडेला  धोकादायक झाडे, झुडपे, काटेरी बाभळी उगवल्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सर्वच प्रकारच्या वाहनचालकांना या काटेरी बाभळी व झुडपांमुळे वाहन चालवताना खूप त्रास होत आहे.

         हिच बाब हवेली तालुका पत्रकार संघाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे हवेली तालुका  पत्रकार संघाच्या सदस्यांनी एक समाजोपयोगी निर्णय घेतला आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन स्वखर्चाने या अस्ताव्यस्त उगवलेल्या काटेरी बाभळी व झुडपे काढून टाकू. पुणे सोलापूर महामार्गावरचे झाडा-झुडपांचे अतिक्रमण काढून नागरिकांच्या जीवितांचे आणि मालमत्तेचे भविष्यात होणारे नुकसान वाचवू. समाजाला एक संदेश देऊ की पत्रकार फक्त बातमीच करत नाहीत तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून श्रमदानातून एखादे सत्कर्म सुध्दा करू शकतात.

           शनिवार दि. १२ जून रोजी सकाळी आठ वाजता लोणी काळभोर फाटा येथे या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने समाजातील गोरगरीब, गरजू नागरिकांना मोफत कपडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या शुभ हस्ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यात होणार आहे अशी माहिती हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र ( बाप्पू ) काळभोर यांनी दिली.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कार्यकारीणी व सर्व सभासद उपस्थित राहणार आहेत.

                   

Comments

Popular posts from this blog