कर्मयोगी कारखान्याचा मिल रोलर पूजन समारंभ संपन्न
कर्मयोगी कारखान्याचा मिल रोलर पूजन समारंभ संपन्न
.(दत्तात्रय गवळी सर,माय मराठी न्यूज इंदापूर)
(इंदापूर 12 जून) कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना लि. बिजवडी या कारखान्याचा सिझन 2021-22 चा 32 व्या गाळप हंगामाचा मिल रोलर पूजन समारंभ आज दि. 12/6/2021 रोजी सकाळी 11 वाजता कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी हर्षवर्धनजी पाटील तसेच कारखान्याच्या व्हाईस चेअरमन श्रीमती पद्माताई भोसले, व सर्व संचालक मंडळ यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर नुकतांच संपन्न झाला. या कार्यक्रमास कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे, सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कारखान्याचा गाळप हंगाम 2021-22 संपूर्ण क्षमतेसह चालविणेत येणार असून कारखाना कार्यक्षेञातील सर्व नोंद/बिगरनोंद ऊस कारखाना गाळप करणार आहे. सध्या बंद हंगामातील ओव्हरहॉलिंगची सर्व कामे प्रगतीपथावर असून कारखाना पूर्ण गाळप क्षमतेने चालविणेसाठी आवश्यकती सर्व व्यवस्था कारखान्याने केलेली आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास अंबादास शिंगाडे, सुभाष काळे, विष्णू मोरे, राजेंद्र गायकवाड, जयश्री नलवडे, राजेंद्र चोरमले, यशवंत वाघ, प्रशांत सुर्यवंशी, मच्छिंद्र अभंग, राहूल जाधव, वसंत मोहोळकर, अंकुश काळे, मानसिंग जगताप, हनुमंत जाधव, भास्कर गुरगुडे, केशव दुर्गे, अतुल व्यवहारे, पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले, कार्यकारी संचालक देवराव लोकरे व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment