राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी थोरात यांची निवड
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी धनाजीराव थोरात यांची निवड.....
माय मराठी न्यूज - भिगवण प्रतिनिधी - (ज्ञानेश्वर राऊत ) - इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी धनाजीराव थोरात यांची नुकतीच निवड करण्यात आली. धनाजीराव थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यन्त पोहचवण्यात उल्लेखनीय योगदान दिले आहे त्याच प्रमाणे ते बाबीर देवस्थान ट्रस्टचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य असल्याने, शिक्षण क्षेत्रातील आवड जपणारे व सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जपणारे दिलखुलास व्यक्तिमत्त्व ओळखून राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. यापुढील काळात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ना. दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे राष्ट्रवादी विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचे मत नुतन उपाध्यक्ष धनाजीराव थोरात यांनी व्यक्त केले तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण सोडविणार असल्याचेही ते म्हणाले दरम्यान जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर, प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे,श्रीराज भरणे यांनी त्यांचे अभिनंदन केले
Comments
Post a Comment