राज ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपनाने साजरा

राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसा निमित्त ढोकी पोलीस स्टेशनमध्ये ५३ रोपांचे वृक्षारोपन

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्त साधून आज दि.१४ जून २०२१ रोजी चिंच,अशोक व सिताफळांच्या ५३ रोपांचे ढोकी ता.उस्मानाबाद येथील पोलीस स्टेशनच्या आवारात उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हासंघटक अमरराजे कदम व पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे यांच्या हस्ते तर शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटेसर,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

यावेळी उस्मानाबाद तालुका उप अध्यक्ष सलीम भाई औटी यांनी सदर वृक्षारोपन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी तालुका सचिव दादा वाघे,काका पाटील,रामभाऊ मोटे,मेहराज सय्यद,
लखन पवार,दिपक पवार,कृष्णा उपाध्ये राहुल खडके,यांच्या सह अनेक मनसैनिक हजर होते.

Comments

Popular posts from this blog