रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथील रोशन धोत्रे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात पंधरावा
रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथील रोशन धोत्रे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात पंधरावा
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत जवाहर नवोदय विद्यालयाचा वर्ग दहावीचा विद्यार्थी महाराष्ट्रात अनुसूचित जमाती गटातून 138 गुण घेऊन 15 वा आला असून त्याची निवड अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत झाली आहे.
यावर्षी महाराष्ट्रात एकूण 821 विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी पात्र झाले असून अखिल भारतीय स्तरावर प्रत्येक राज्यातून प्रथम परीक्षेत पात्र विद्यार्थी मधून अंदाजे दोन हजार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिल्या जाते. शालेय स्तरावर पात्र विद्यार्थ्यांना विशेष स्थान असते.
सलग दोन वर्षे जवाहर नवोदय विद्यालय वाशीम या महत्वकांक्षी परीक्षेत पात्र होण्याची परंपरा कायम ठेवली आहे. रोशन धोत्रे त्यांचे पालक शिवनाथ धोत्रे व विषय शिक्षकांचे कौतुक प्राचार्य आर.एस. चंदनशीव व उपप्राचार्य श्रीमती साखरे यांच्या द्वारे करण्यात आले.
रिसोड प्रतिनिधी / उकंडी ढेंबरे.
Comments
Post a Comment