धाडसी पत्रकार व मिञ हरपला-हर्षवर्धन पाटील
धाडसी पत्रकार व मित्र हरपला-हर्षवर्धन पाटील
- तुषार घाडगे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
इंदापूर:प्रतिनिधी दि.19/6/21
पत्रकार तुषार घाडगे यांच्या आकस्मिक निधनामुळे इंदापूर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्राबरोबर सामाजिक, राजकीय क्षेत्राचे नुकसान झाले आहे. धाडसी पत्रकार व माझा जवळचा मित्र हरपला आहे, अशा शब्दांत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
वालचंदनगर येथे पत्रकार तुषार घाडगे यांच्या कुटुंबीयांची हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.18) भेट घेऊन सांत्वन केले. पत्रकार तुषार घाडगे यांना सामाजिक प्रश्नांची जाण होती. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांची भेट झाल्यावर आमच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा होत, त्यांना शेतीची चांगली जाण होती, अशा आठवणी हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितल्या. या सांत्वन भेटीप्रसंगी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment