माजी मंत्री महादेव जानकर यांनी घेतली मखरे कुटुंबाची भेट

माजी मंत्री महादेवजी जानकर यांनी दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट
इंदापूर:- दि.२६ ( प्रतिनिधी) इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या निधनानंतर आज रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा. महादेवजी जानकर साहेब यांनी मखरे कुटुंबीयांची  सांत्वनपर भेट घेतली.
माजी मंत्री महादेव जानकर साहेब म्हणाले की, मखरे तात्या हे वादळी व झंझावाती व्यक्तिमत्व होते.ते आपल्या धाडसी, करारी व निर्भिड स्वभावाने महाराष्ट्राला परिचित होते. त्यांनी आयुष्यभर उपेक्षित वर्गासाठी काम केलं. शिक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या मुलांसाठी सर्व सोयीयुक्त शिक्षणाची सोय केली व खऱ्या अर्थाने त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात या बहुजनांच्या मुलांना आणलं. मखरे तात्या आणि माझे व्यक्तिगत चांगले संबंध होते. भविष्यात मी मखरे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. माझी आपणास कधीही मदत लागल्यास कधीही हाक मारा, मी आपल्या मदतीला धावून येईल.काळजी करु नका. अशा शब्दांत माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांत्वनपर भेटीवेळी मखरे तात्यांचे सुपुत्र ॲड. समीर मखरे यांच्याशी बोलले.
यावेळी दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला मखरे , पुत्र ॲड.समीर मखरे व राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा प्रभारी श्री. किरण गोफणे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog