सोलापूर-हैद्राबाद नॅशनल हायवेवर रिक्षा व बोलेरो चा भिषण अपघात
सोलापूर हैदराबाद नॅशनल हायवे रिक्षा व बोलेरो चा भीषण अपघात
पहाटेच्या अपघातात तीन महिला जखमी पण ...बोलोरो मध्ये सापडले हातभट्टी दारूच्या ट्यूबा....
(सोलापूर उमेश जाधव माय मराठी वृत्तसेवा)
: अवैध हातभट्टी दारूचा पुरवठा करणाऱ्या बोलेरो जिपचे रिक्षाला जोरदार धडक बसून तीन प्रवाशांसह रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग वर घडली. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार पोलिस पथकांनी घटनास्थळी जाऊन जखमी तीन महिलांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अवैध दारू रबरी ट्यूब मध्ये साठवण करून तो बोलेरो जीप MH.13 AC.0788 मधून तो सोलापूरकडे भरधाव निघाला असता समोरून तीन प्रवाशांना घेऊन येणाऱ्या MH.13 CT. 8356 या रिक्षाला जोराची धडक दिली या अपघातात रिक्षा चालकासह जखमी झाले .एमआयडीसी पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने काढून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
Comments
Post a Comment