पुणे आज पासुन असे असेल वेळापत्रक

पुणे, आज पासून सर्व दुकाने सुरू; असे असणार वेळापत्रक

प्रतिनिधि, गणेश तौर, हवेली, पुणे

पुणे – राज्यशासनाच्या अनलॉकच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार आता शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरू असणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने याच वेळेत सुरू राहणार आहे. तर शहरातील हॉटेल सह, खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सुरू राहणार असून सायंकाळी पाच पर्यंत जमाबंदी तर सायंकाळी 5 नंतर संचारबंदी असणार आहे.

या शिवाय, चार महिन्यानंतर पुन्हा एकदा पीएमपीची बस सेवा 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असून सांस्कृतीक तसेच सामाजिक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. मात्र, या नियमावलीत नाटयगृहे तसेच चित्रपटगृहे बंदच ठेवण्यात येणार आहेत. तर सलून, स्पा आणि ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्यानांचे दरवाजे पुन्हा उघडणार आहेत.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, येत्या सोमवार ( दि. 7 जून) पासून या सुधारीत नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या शिवाय, बॅंका तसेच वित्तीय संस्थाचे कामकाज आठवडभर नियमित वेळेत सुरू असणार आहे. पुणे आणि खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्डासाठी हे आदेश असणार असून या आदेशानुसार, शहरातील शाळा 30 जून पर्यंत बंदच असणार आहेत.

पुण्यात हे राहणार सुरू
हॉटेल, रेस्टोरंट ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने
 हॉटेल मधून शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा
लोकल – फक्त अत्यावश्‍यक सेवा कर्मचारी
 सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत
 खासगी कार्यालये ( सोमवार ते शनिवार ) – दुपारी 4 पर्यंत ( 50 टक्के कर्मचारी क्षमता)
 क्रीडा – सकाळी 5 ते 9 , सायंकाळी 6 ते 9 रिकाम्या जागा, मैदानात
 चित्रीकरण – बायोबाल , सायंकाळी 5 पर्यंत
 सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम -50 जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत
 लग्न – 50 जणांच्या उपस्थितीत
 अंत्यविधी – 20 जणांच्या उपस्थितीत
 शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – 50 टक्के उपस्थिती
बांधकाम – दुपारी 4 पर्यंत मुभा
 शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत
 शहरात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी
 जिम, सलून, ब्युटी पार्लर – 50 टक्के क्षमतेने , पूर्व नियोजित वेळ घेऊन
 सार्वजनिक वाहतूक सेवा -50 टक्के क्षमतेने केवळ बसून
 ई कॉमर्स – नियमित वेळेत
 माल वाहतूक – नियमित वेळेत
 अत्यावश्‍यक वस्तू उत्पादन कंपन्या, आयटी, डेटा सेंटर, – नियमित वेळेत.

Comments

Popular posts from this blog