वेळापुर ग्रामपंचायत च्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा💐
मौजे वेळापूर ता.माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने कोरोनाचे सर्व नियम पाळत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन जि.प.सदस्य बाळासाहेब धाईंजे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी डी.के.गोरे , उपसरपंच जावेद मुलाणी , साजिद मुलाणी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक सुनिल पुलिगेट , जयंत कुलकर्णी , रवि बनसोडे , बापू मांडवे , नागेश मोरे आणि ग्रामपंचात कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगिताने आणि महाराष्ट्र गिताने झाली. व सांगता शिवाजी महाराज की जय या घोषाने करण्यात आली.
धनाजी धांडोरे माय मराठी न्युज वेळापुर
Comments
Post a Comment