कु. अंकिता पाटील यांच्या प्रयत्नातून 25 लाखांच्या कामाचे उदघाटन

अंकिता पाटील यांच्या प्रयत्नातून लाखेवाडी-खाराओढा रस्त्यासाठी 25 लाख रुपये मंजूर
लाखेवाडी-खाराओढा रस्त्याचे भूमिपूजन अंकिता पाटील यांच्या हस्ते संपन्न
   इंदापूर प्रतिनिधी
आज लाखेवाडी येथील लाखेवाडी- खराओढा रस्त्याचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रस्त्यासाठी लेखाशिर्ष 30-54 निधीतून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे व त्यासाठी 25 लक्ष रुपये निधी कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे.
    यावेळी यावेळी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजीराव नाईक, वसंत नाईक, सखाराम थोरवे, प्रभाकर खाडे, किसन जाधव, विष्णू जाधव, माजी उपसरपंच आप्पासो ढोले, रवींद्र पानसरे, पोलीस पाटील रामचंद्र निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश निंबाळकर, वामन निंबाळकर, शिवाजी घोगरे, बापूराव ढोले, रामचंद्र नाईक, पांडुरंग माने, काशिनाथ अनपट, धनंजय गिरमे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog