पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी काम करा-जयंत पाटील
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा - जयंत पाटील
वरवडे ( प्रतिनिधी बंडू भोसले )
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे सांगोला दौऱ्यावर जात असताना माढा तालुक्यातील भिमानगर , टेंभुर्णी , वेणेगाव , दगड अकोले , परिते , वरवडे , आदि गावांमध्ये ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही आतापासूनच शेकापचे नेते अॅड बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागा असे मत आमदार पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्याजवळ व्यक्त केले. प्रसंगी पक्षाची बांधणी संघटना मजबूतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य सरचिटणीस या नात्याने मी करेन असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
Comments
Post a Comment