कंकरवाडी व परिसरातील विद्यार्थ्यांना खूश खबर,८वी ते १२ वी चे वर्ग लवकरच होणार सुरु....

रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथे आठवी ते बारावी चे वर्ग होणार सुरु!


   देशामध्ये गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट ओढले आहे.तर शिक्षण क्षेत्रही बंद आहे.त्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे खुप प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथील सरपंच सौ. वर्षा ताई देवकर यांनी महत्वाचा निर्णय घेऊन ८ वी ते १२वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय दिनांक १२/७/२०२१ रोजी घेतला आहे.
      त्यामुळे सर्व विद्यार्थ्याचा फायदा होणार आहे.हा महत्वाचा निर्णय घेऊन त्यांनी फार मोलाचे काम केले आहे.त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.विशेष म्हणजे आदिवासी बहुमूल्य भाग कंकरवाडी,आगरवाडी, कुऱ्हा लोणी, चींचांबा भर आदी गावे आहेत 
      आदिवासी लोकांची संख्या जास्त असून त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.हा ठराव घेतांना उपस्थित सरपंच सौ.वर्षाताई देवकर ,उपसरपंच भिमराव शेजुळ,ग्राम सेवक पडोळे ,मुख्याध्यापक श्री जाधव सर,ग्रामपंचायत सदस्य माधव जाधव,प्रभू बोंडे,मीनाक्षी मुंढे,नारायण घुगे,माधुरी कोल्हे, पर्यागाबाई जाधव,लक्ष्मी जाधव व शाळा समिती सदस्य उपस्थित होते.
रिसोड तालुका प्रतिनिधी /उकंडी ढेंबरे

Comments

Popular posts from this blog