आय कॉलेज च्या प्रवेश पोर्टल चे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

आय कॉलेजच्या प्रवेश पोर्टलचे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उदघाटन
  इंदापूर प्रतिनिधी
 इंदापूर येथील आय कॉलेजने विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी वेब पोर्टल बनविले आहे, त्याचे उदघाटन माजी मंत्री व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते शनिवार, दि. 17 जुलै 2021 रोजी करण्यात आले. 
  यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, कला शाखाप्रमुख डॉ. भिमाजी भोर, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. शिवाजी वीर, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड, क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ, प्रा. संदीप शिंदे आणि एनसीसी अधिकारी डॉ. बाळासाहेब काळे उपस्थित होते.
   कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी BA, B.Com., B.Sc., BBA (BCA), B.Voc., M.A., M.Com., M.Sc., Ph. D. पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या वेबपोर्टलवरून प्रवेश फॉर्म भरता यावा, यासाठी  हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या सहकार्याने डॉ. बाळासाहेब काळे व प्रा. संदीप शिंदे यांनी हे वेबपोर्टल बनविले आहे.  
  वेबपोर्टलचे उदघाटन करताना संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील म्हणाले की,' कोरोना पार्श्वभूमीवर या वेबपोर्टलचा फायदा महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. आभार डॉ. भिमाजी भोर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog