हर्षवर्धन पाटील यांची लोणकर कुटुंबियांना सव्वा लाखाची मदत

हर्षवर्धन पाटील यांचेकडून लोणकर कुटुंबीयांचे  सांत्वन 
 - पाटील कुटुंबियांकडू सव्वा लाखाची मदत
 - पुण्यात लोणकर कुटुंबीयांची घेतली भेट
 - शासनाकडून युवकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष
इंदापूर:प्रतिनिधी दि.19/7/21
                 भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फुरसुंगी-पुणे येथे स्व.स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सोमवारी सांत्वन केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी  लोणकर कुटुंबियांकडे पाटील कुटुंबियांच्या वतीने सव्वा लाख रुपयांची मदत सुपूर्त केली.
                स्वप्निल लोणकर हे अतिशय हुशार व बुद्धिमान युवक होते. अहोरात्र अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश संपादन केले होते. मात्र त्यांना शासनाकडून नोकरीचे नियुक्ती पत्र दिले जात नव्हते. घरची परिस्थिती हलाखीची होती,  आर्थिक अडचणी वाढत होत्या. त्यामुळे शासनाकडून नोकरीच्या नियुक्तीसाठी होणाऱ्या विलंबास कंटाळून निराश झालेल्या स्वप्निल लोणकर यांनी आपले जीवन संपविले. शासकीय अनास्था यास कारणीभूत आहे. राज्य शासनाकडून युवकांच्या प्रश्नांकडे, त्यांना रोजगार मिळवून देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
                  राज्यात सध्या सुमारे 5 ते 6 लाख युवक एमपीएससीचा अभ्यास करीत आहेत. राज्य शासन मात्र शासकीय सेवेतील जागा भरण्यास चालढकल करीत आहे. कधीतरी केवळ 600 ते 700 जागा भरून बेरोजगारी संपणार नाही, रोजगाराअभावी युवकांमध्ये नैराशेचे  वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे  शासकीय सेवेतील रिक्त असलेल्या सुमारे 1.5 ते 2 लाख जागा भरण्यासाठी प्रक्रिया शासनाने तात्काळ चालु करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog