सोलापुरात हात भट्टी दारू बनवणाऱ्या मळीचे दोन टेम्पो पकडले...
ब्रेकिंग ! हातभट्टी दारू बनवणाऱ्या मळीचे दोन टेम्पो पकडले ; 20 लाखाचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई...
(उमेश जाधव सोलापुर प्रतिनिधी)
सोलापूर शहर परिसरात अवैध हातभट्टी दारू तयार करण्यासाठी दोन मळीचे टेम्पो जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली त्यानुसार सोलापूर हैदराबाद तसेच सोलापूर अक्कलकोट रोड वर सापळा रचून दोन आयशर कंपनीचे सहाचाकी वाहन क्र. MH १३ / CU- ३९०१ व MH- १३ / CU- १६१८ पोलिसांनी जप्त केले, यामधील अंदाजे 19 मेट्रिक टन मळी होती, त्याची किंमत सुमारे 20 लाख आहे. या कारवाईत टेम्पो चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई 21 जुलै रोजी झाली. अधीक्षक रविंद्र आवळे तसेच उप-अधीक्षक, अदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली किरण बिरादार प्र.निरीक्षक ब विभाग व दुय्यम निरीक्षक, अ-२ सोलापूर, जी.सी.बेळळे, प्र.निरीक्षक, भरारी पथक विभाग सोलापूर व एम. एम. चव्हाण, सह उपनिरीक्षक, तसेच या विभागाचे जवान गजानन ढब्बे, किशोर लुंगसे, अनिल पांढरे, विजय, शेळके, प्रकाश सावंत, तानाजी माने, दिपक वाघमारे वाहनचालक आदीनी हि कारवाई पार पाडण्यास मदत केली. पुढील तपास प्र. निरीक्षक किरण बिरादार हे करित आहेत.
Comments
Post a Comment