महाराष्ट्र राज्य चालक-मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेकडून हर्षवर्धन पाटील यांना निवेदन
महाराष्ट्र राज्य चालक-मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेकडून हर्षवर्धन पाटील यांना निवेदन
- पुण्यात दिले मागण्यांचे निवेदन
इंदापूर:प्रतिनिधी दि.25/7/21
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भगवे वादळ महाराष्ट्र राज्य चालक-मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पुणे येथे नुकतेच भेटून सादर केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मागण्यांवरती सविस्तर चर्चा केली व सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने राज्यातील स्कूल बस वाहतूकदार आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे कोरोना काळातील स्कूलबस वरील कर माफ करावा, स्कूल बस चालक व मालकांवर बेरोजगारीची वेळ आल्याने सरकारने बेरोजगार भत्ता द्यावा. स्कूलबसला विनाअट दुसरे भाडे करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी तसेच कोरोना काळातील बसवरील व्याज, दंड माफ करून शाळा पूर्णपणे सुरू झाल्यानंतर कर्जाचे हप्ते चालू करण्यात यावेत या मागणीसाठी भगवे वादळ महाराष्ट्र राज्य चालक - मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना पुणे येथे भेटून निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष अतुल खोंड, संपर्क प्रमुख योगेश बुऱ्हाडे, ॲड. सिद्धार्थ गायकवाड, पश़्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बाळासाहेब वाघे, पुणे शहर अध्यक्ष प्रविण जागडे-पाटील, राज्य सदस्य मिलिंद हेंद्रे व पदाधिकारी उपस्थित होते.
_______________________________
Comments
Post a Comment