पांडुरंग शिंदे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने नागरी सत्कार

पांडुरंग शिंदे सर्वसामान्यांसाठी लढणारे कार्यकर्ते- हर्षवर्धन पाटील

(इंदापूर प्रतिनिधी धनश्री गवळी)
    इंदापूर नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग हरिभाऊ शिंदे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 7 वर्षपूर्ती निमित्त (दि.4 जुलै) आयोजित रक्तदान शिबिर, कोविड योद्धा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन संत सावतामाळी मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले यावेळी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पांडुरंग शिंदे सर्वसामान्यांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत असे मत व्यक्त केले.
   कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम.के. इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी, क्रांतीज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्य ,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुणे जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले.
    यावेळी गोरगरीब 70 महिलांना साडी वाटप करण्यात आले.माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, डॉ. संदेश शहा, कृष्णा सातपुते, ऐजाज कुरेशी, राधा खुडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
 हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' लोकांच्या सेवेसाठी पांडुरंग शिंदे यांचे मोठे कार्य आहे.अडीअडचणीत लोकांना ते मदत करतात. लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. डॉ. इनामदार यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान मोठे असून कोरोना काळामध्ये व्यक्तींच्या उपचारासाठी ते सदैव प्रयत्नशील होते.
  गटनेते कैलास कदम, नंदकुमार केंगार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
   सर्वसामान्य गरीब व्यक्तींच्या मदतीसाठी, सहकार्यासाठी सतत प्रयत्नशील राहू असे मत यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग शिंदे यांनी व्यक्त केले.
 या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकील सय्यद, माजी नगरसेवक शेखर पाटील, युवराज मस्के, रघुनाथ राऊत, गणेश महाजन, बंडा पाटील, प्रशांत उंबरे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog