भाजपा कामगार आघाडी कडून आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना छत्री, मास्क व सॅनिटायझर चे वाटप

आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना छत्री, मास्क आदी साहित्याचे वाटप
 भाजप जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भाजप कामगार आघाडीचा उपक्रम
 
पुणे जिल्हा भाजप कामगार आघाडीच्या वतीने भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली येथील आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना मास्क,छत्री व कोरोना बचावासाठी उपयुक्त साहित्याचे वाटप 13 जुलै रोजी करण्यात आले. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका ऊन व पाऊस तसेच कोरोनाच्या कठिण काळांमध्ये अविरत काम करत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजप कामगार आघाडीच्या वतीने  साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
येथील ग्रामपंचायत सभागृहांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे,भाजप भटक्य विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक वणवे, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, भिगवणचे सरपंच  तानाजी वायसे, माजी सरपंच पराग जाधव, भाजपचे गटनेते संपत बंडगर, प्रदेश सचिव दिनेश मारणे, जिल्हा उपाध्यक्ष संजय सकुंडे, मावळ तालुकाध्यक्ष 
अमोल भेगडे, आंबेगाव तालुकाध्यक्ष दिलीप यलभर, दौंड तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, सचिव शशिकांत कुंटे, संदीप खुटाळे, अशोक पाचांगणे, माजी उपसरपंच 
जयदीप जाधव,हरिभाऊ पांढरे, जावेद शेख, बाळा भोसले, गुराप्पा पवार, तक्रारवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सचिन वाघ, रोहित बगाडे भाजप भिगवण 
शहराध्यक्ष राजेंद्र जमदाडे, उपाध्यक्ष दिलीप कुंभार आदींसह भिगवण ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.
भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे म्हणाले, जिल्ह्यामध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भाजप कामगार आघाडीच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्यात येत आहेत. कोरोनाच्या कठिण काळात आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनी उल्लेखनीय काम केले आहे. फ्रंटलाईन वर्कर असलेला हा घटक मात्र दुर्लक्षित राहिला आहे. भाजप कामगार आघाडीने आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना छत्री, मास्क कोरोनापासुन बचावासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक दिनेश मारणे यांनी केले, सुत्रसंचालन राजेंद्र जमदाडे यांनी केले तर आभार संदीप खुटाळे यांनी मानले.
  ज्ञानेश्वर मारकड,दिलीप कुंभार, गणेश खडके, रोहित बगाडे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog