इंदापुर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी
जंगलाचा राजा सिंह,पक्षांचा राजा गरुड, फुलांचा राजा गुलाब तसेच शब्दांचे राजे साहित्यरत्न लोकशाहीरअण्णा भाऊ साठे -मा.सौ. नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा.
इंदापूर प्रतिनिधी धनश्री गवळी.
साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त नगराध्यक्षा सौ अंकिता शहा व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री मुकुंद शेठ शहा यांनी आज लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या 101 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे विविध शालेय अभ्यासक्रमाची व वैचारिक पुस्तके श्री नारायणदास रामदास शहा पब्लिक चारीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने 101 व्या जयंतीचे औचित्य साधून भेट दिली. त्यानंतर येथे यूपीएससी, एमपीएससी या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या आपल्या वाचनालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या इंदापूर शहराची तसेच या वाचनालयाची शोभा वाढवावी तुम्हाला तुमच्या भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देत सर्वांचे अभिनंदन केले. नंतर श्री नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय मुकुंद शेठ शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आजपर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून इंदापूर शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांना मंडळांना ट्रस्टच्यावतीने मदत केलेली आहे येथून पुढे ही आपल्या वाचनालयाला यापुढील काळात कशाची ही अडचण किंवा गरज निर्माण झाली तरी आम्ही ती अडचण ,गरज सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करून टाकून मार्ग काढू. या वाचनालयातील यावर्षी किमान दोन तरी विद्यार्थी विविध स्पर्धेत उत्तीर्ण झाले तर आम्हाला आमचे या मदतीचे सार्थक झाल्याचा अभिमान वाटेल.
याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष श्री उमेश ढावरे यांनी नगरअध्यक्ष माननीय सौ. अंकिता ताई शहा व श्री मुकुंद शेठ शहा यांचा यथोचित असा सन्मान केला यावेळी सामाजिक कार्यकर्तेॲड. नारायण ढावरे, सुनील सोनवणे, सुनील माने, युवराज चौगुले, रोहन उकिर्डे , नागेश शिंदे व रोहित शिंदे उपस्थित होते. त्यानंतर श्री नंदू खंडागळे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment