वैराग ते उस्मानाबाद रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन
(वैराग प्रतिनिधी) वैराग ते उस्मानाबाद हा मुख्य मार्ग असून मराठवाड्याला जोडणारा रस्ता आहे, या मार्गावर चांगलीच वर्दळ असते परंतु अनेक दिवसांपासून हा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे.
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे तर झालेला थोडाफार रस्ताही अर्ध्या वरतीच सोडला आहे या सर्व आशयाचे निवेदन घेऊन वैराग येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन संबंधित रस्त्याबाबत चर्चा करून निवेदन दिले आहे.
मंत्री अशोक चव्हाण यांनीही हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे.
Comments
Post a Comment