भिमाई आश्रमशाळेत ७५ वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम संपन्न
भिमाई आश्रमशाळेत ७५ वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम संपन्न:
( संस्थाप्रमुख आयु.शकुंतला मखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण)
इंदापूर(दि.१५) :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक ,माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा व मुलांचे ,मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिन तथा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा वर्धापन दिन (दि.१५) स.८:२० वा.साजरा करण्यात आला.ध्वजारोहण इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड.समीर मखरे, संचालक राहुल सवणे ,गोरख तिकोटे, अस्मिता मखरे,संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अश्वजीत कांबळे, गोरख चौगुले व संस्थेतील सर्व विभाग प्रमुख , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नानासाहेब सानप सर यांनी केले. कार्यक्रम स्थळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घेण्यात आली.
Comments
Post a Comment