अष्टविनायक पुरस्काराने केले सन्मानित....
भारतीय जनता पार्टी निमगाव केतकी आयोजित कार्यक्रमांमध्ये आज माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील काही दानशूर तसेच समाज सेवा करणारे व्यक्ती यांना सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या हस्ते अष्टविनायक कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आले यामध्ये इंदापूर शहरातील श्री देशपांडे व्हेज चे मालक उदय देशपांडे व किरण गानबोटे यांनी कोरोना या रोगाच्या महामारी मध्ये संपूर्ण देशामध्ये लॉक डाऊन सुरू होते यातच काही लोकांना एक वेळेस खाण्यासाठी अण्ण मिळत नव्हते रुग्णांना वेळेत चांगल्या प्रतीचे जेवन मिळत नव्हते, म्हणून इंदापूर शहरातील या दोन व्यक्तींनी आपल्या हॉटेल मार्फत रुग्णांना जेवणाची सोय केली होती म्हणूनच त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन आज त्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे ओबीसी सेलचे अध्यक्ष माननीय योगेश अण्णा टिळेकर, इंदापूर अर्बन बॅंकेचे चेअरमन माननीय देवराज भाऊ जाधव, ओबीसी सेलचे इंदापूर तालुका अध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment