केंद्रीय राज्यमंत्री ना. आठवलेंनी घेतली मखरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
(इंदापूर प्रतिनिधी) :- येथील इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या निधनानंतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदासजी आठवलेंनी (दि.१८) मखरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
ना. आठवलेंनी दिवंगत पॅंथर रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ॲड.राहुल मखरे, आयु.शकुंतला मखरे (काकी) व कुटुंबीयांची आस्तेने विचारपूस करत संवाद साधला . दिवंगत रत्नाकर मखरेंच्या सामाजिक, राजकीय कार्याला उजाळा दिला.
यावेळी संदीपान कडवळेंनी ॲड. राहुल मखरे कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाचे कामकाज पाहत असून बहुजन समाजाच्या वतीने आपली बाजू मांडत आहे. त्यावर ना. आठवलेंनी ॲड. राहुल मखरेंकडून कोरेगाव-भिमा संदर्भात सुरु असलेल्या चौकशी आयोगाच्या कामकाजाबद्दल माहिती जाणून घेतली.तदनंतर भिमाई आश्रमशाळेची पाहणी करून ना. आठवलेंनी समाधान व्यक्त केले .
यावेळी दिवंगत पॅंथर रत्नाकर मखरेंच्या पत्नी शकुंतला मखरे, पुत्र ॲड. राहुल मखरे, संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीय उपस्थित होते.
तसेच तहसिलदार श्रीकांत पाटील, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment