बार्शीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस चे गॅस दरवाढ विरोधात आंदोलन

(बार्शी प्रतिनिधी)
प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली व निरंजन भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती वापराच्या LPG गॅस सिलेंडरच्या वारंवार होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस बार्शी यांनी बार्शी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस बार्शी तालुकाध्यक्षा ऍड. सुप्रिया गुंडपाटील बोलताना म्हणाल्या की, कॉग्रेस सत्तेत असताना 50 रूपये भाववाढ झाली म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या स्मृती इराणी गेल्या कुठ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.हाताला रोजगार नसताना अशी वारेमाप भाववाढ करून जनसामान्यांना त्रस्त करण्याऐवजी भाववाढ कमी करुन महिला वर्गाला दिलासा द्यावा असे मत व्यक्त केले. होणारी भाववाढ तात्काळ कमी केली नाही तर येणार्‍या काळात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस केंद्रशासनाविरोधात रस्तावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी रेखाताई तुपे, दैवशाला जाधवर, शामल काशीद, साखरबाई चौधरी व महिलावर्ग उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog