हर्षवर्धन पाटील यांनी राज्यात इंदापूर तालुक्याचा नावलौकिक वाढविला- उदयसिंह पाटील
इंदापूर:प्रतिनिधी दि.22/8/21
माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलसाहेब यांनी राज्यात काम करीत असताना आपल्या सुसंस्कृत व अभ्यासू व्यक्तीमत्वावाच्या जोरावर इंदापूर तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. तसेच इंदापूर तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दर्जेदार शिक्षण तालुक्यातच उपलब्ध करून दिले आहे, असे गौरवोद्गार नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी काढले.
बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांचा 58 वा वाढदिवस शनिवारी (दि.21) उत्साहात साजरा करण्यात आला. बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने श्री शिवाजी विद्यालयामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, केक कापणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना उदयसिंह पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रिपदाच्या काळात तालुक्यात अनेक सहकारी संस्था निर्माण केल्या, त्यामुळे हजारो हातांना काम मिळाले आहे. हर्षवर्धन पाटील हे माणुसकीची प्रतिष्ठा वाढवणारे, सर्वांना हवेहवेसे वाटणारे आदर्श व्यक्तिमत्व आहे. सर्वसामान्य जनतेची असलेली बांधिलकी त्यांनी कायम ठेवलेली आहे. आगामी काळ त्यांच्यासाठी निश्चितपणे उज्ज्वल व राजकीय प्रतिष्ठा उंचावणारा असणार आहे, असे उदयसिंह पाटील यांनी भाषणात नमूद केले. यावेळी अमरसिंह पाटील यांचे भाषण केले. यावेळी राज्यात दहावीत प्रथम आलेली विद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती माने हीचा सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिरामध्ये 101 बाटल्या रक्त जमा करण्यात आले. यासाठी अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेने सहकार्य केले. यावेळी सरपंच किरण पाटील, विकास पाटील, महादेव घाडगे, पंडितराव पाटील, सुधीर पाटील, उमेश सूर्यवंशी, प्रसाद पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे, स्वप्नील घोगरे, संतोष सुर्यवंशी, पवन घोगरे, अमोल घोगरे, सचिन सावंत, रणजित घाडगे, विजय काटकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभारी प्राचार्य जी.जे.जगताप, डी.आर.घोगरे, भीमराव आवारे, जी.एस.घोरपडे, ए.बी.सुळे, एल.एस.वावरे, व्ही.के. मोहिते या विविध शाखांच्या प्राचार्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन एस. टी.मुलाणी यांनी केले.
Comments
Post a Comment