वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल
 #चांगल्या प्रतीच्या धान्याचे स्वस्त धान्य दुकानातून वाटप#

ता.अध्यक्ष सय्यदअकिल यांनी केली पाहणी
रिसोड/तालुका प्रतिनिधी:-तालुक्यातील रेशन दुकानातून निकृष्ठ प्रतीचे खाण्यास अयोग्य धान्याचे वाटप होत असल्याच्या तक्रारी विविध गावातील ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीकडे केल्या होत्या या बाबीची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष सय्यद अकिल यांच्या नेतृत्वात 9 ऑगस्टला एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते या आंदोलनात तालुक्यातील बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. सदर प्रकरण हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी संबंधित असल्यामुळे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत व तहसीलदार अजित शेलार यांनी दखल घेऊन शेलार यांनी अन्नत्याग आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व रास्त मागण्यांचा निपटारा तात्काळ करण्याचे आश्वासन तालुका अध्यक्ष सय्यद अकिल यांना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या समक्ष दिले होते.तहसीलदार अजित शेलार यांनी दिलेला शब्द पाळला असून सध्या रेशन दुकानातून पुरवठा केला जात असलेला धान्य आदी माल हा उत्कृष्ट दर्जाचा आहे.वंचित आघाडीचे तालुका अध्यक्षांनी तालुक्यातील रेशन दुकानांना प्रत्यक्ष भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला .चांगल्या प्रतीचे धान्य उपलब्ध होत असल्यामुळे  लोकांनी वंचित बहुजन आघाडी व तहसीलदार यांना विशेष धन्यवाद दिले.यानंतर तालुक्यातील कोणत्याही गावात रेशन दुकानातून निकृष्ठ दर्जाचे धान्य वितरित होत असेल तर ती तक्रार गावातील वंचित बहुजन आघाडीच्या ग्राम शाखा अध्यक्ष कडे किंवा तहसील कार्यालयाकडे करावी असे आवाहन तालुका अध्यक्ष सय्यद अकिल यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog