गटनेते कैलास कदम.
प्रतिनिधी.. इंदापूर
सुतार गल्ली जामदार गल्ली मुलाण पट्टा रोहिदास नगर वडार गल्ली रामोशी गल्ली लोहार गल्लीतील वरील भागात नगरपरिषदेने केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेऊ नये असा रोखठोक सवाल गटनेते कैलास कदम यांनी केला आहे.
इंदापूर नगरपरिषदेने माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केलेल्या प्रयत्नातून तसेच या भागातील नगरसेवक नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम,नगरसेविका मीना मोमीन यांच्या पाठपुराव्याने नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा अंतर्गत प्रभाग क्रमांक ६ मध्ये मुलाणी हाँस्पिटल ते कुंभार घरापर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे,संभाजी चौक ते रोहिदास गल्ली ते होनराव घरापर्यंत रस्ता करणे,कुंभार वाडा ते पाणदरानाला इंद्रेश्वर मंदिरापर्यंत मुलाणपट्टा येथे रस्ता करणे,सुतार गल्ली व जामदार गल्लीमधील सर्व बोळ काँक्रीटीकरण करणे,विठ्ठल माने घर ते गायकवाड घरापर्यंत बोळ काँक्रीटीकरण करणे,रमेश बनसोडे घर ते मच्छिंद्र माने घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामांसाठी जवळपास ६० लाख रूपयांचा निधी मंजूर करून आणला.तसेच महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रामोशी गल्लीमध्ये उमाजी नाईक समाज मंदिर ते पाटोळे घरापर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे,रामोशी गल्ली ते बावडा वेस अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे,राजे उमाजी नाईक चौक ते रामोशी गल्ली व वडार गल्ली ते जोतिबा मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे याकामासाठी जवळपास ३४ लाख रूपये निधी सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून आणला.सदर कामांच्या निविदा मंजूर झाले असून काम सुरू करण्याचे आदेश देणे अजून बाकी आहे तोपर्यंतच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदर कामांचे फुकटचे श्रेय घेण्याच्या हेतूने दोन दिवसांपूर्वी उदघाटन करून आम्हीच कामे मंजूर करून आणली असा दिखावा तेथील नागरिकांपुढे केला.राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांनी केलेल्या कामांचे श्रेय नक्की घ्यावे परंतू असा रडीचा डाव करू नये.नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आलेमुळे असा केविलवाणा प्रयत्न त्यांचेकडून होताना दिसत आहे.
Comments
Post a Comment