पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध:-एम. डी. शेख

पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यास कटिबध्द : एम. डी. शेख.
इंदापूर वार्ताहर, ता. १७
लोकशाहीचा चौथा  स्तंभ असणाऱ्या  सर्व पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एम.डी. शेख यांनी केले. 
मुंबई येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एम.डी.शेख तसेच सन १९४१ साली स्थापन झालेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे संघाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी एम.डी.शेख यांचा पत्रकारितेतील योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.यावेळी मुंबईबरोबरच राज्यातील  पत्रकारांच्या विविध अडचणीवर सविस्तर चर्चा झाली.
श्री. शेख पुढे म्हणाले, पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्यासाठी शासनाकडे संपूर्ण ताकदीने पाठपुरावा केला जाईल.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे म्हणाले, एम. डी. शेख हे अभ्यासू व लढवैय्या पत्रकार असून त्यांच्या सहकार्याने   पत्रकारांना चांगले दिवस निश्चित येतील असा विश्वास वाटतो. त्यामुळे समान कार्यक्रम हाती घेऊन पत्रकारांचे प्रश्न सोडविले जातील. त्यासाठी कोरोना महामारी प्रतिबंध संपल्यानंतर लवकरच मुंबई येथे मोठा कार्यक्रम घेतला जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी शासनाने सर्व पत्रकारांचा विमा उतरविला पाहिजे, कोरोना महामारीमुळे मरण पावलेल्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या पीआयबी विभागाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर झाली असून त्या धर्तीवर राज्यशासनाने देखील मदत करावी,  लॉक डाऊन कालावधीमध्ये केवळअधिस्विकृती धारक पत्रकारांनाच सर्वत्र मुभा असते, त्या  बरोबर सरसकट पत्रकारांना सवलती मिळाव्यात, राज्यातील  पत्रकारांवर  हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांवर  दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात यावेत, पत्रकारांना निवृत्तीनंतर पेन्शन योजना चालू करावी,मुंबई येथे लोकल रेल्वेचा प्रवास करण्यासाठी अधि स्वीकृतीधारक पत्रकारांप्रमाणेच  सर्व पत्रकारांची  सोयअसली पाहिजे, ग्रामीण पत्रकारांना शासनाने प्रवास भत्ता, सवलतीत एस टी, रेल्वे व विमान प्रवास, हायवेवरून प्रवास करताना टोल नाक्यावरील टोल फ्री करण्यात यावा, तालुकास्तरावर पत्रकार भवन व गृह निर्माण संस्था, मुंबई येथे राज्यातून विविध कामांसाठी येणाऱ्या पत्रकारांची निवास व भोजनाची सोय करण्यासाठी भव्य पत्रकार भवन अशा समयोचित प्रश्नांवरप्रदीर्घ चर्चा करण्यात आली.  हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून एकसंघपणे प्रयत्न करण्याचे ठरले.  
यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीसअरुणकुमार एस. मुंदडा, कार्य कारीणी सदस्य तथा पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, पत्रकार संजय धोत्रे तसेच संघाचे पत्रकार उपस्थित होते.  

Comments

Popular posts from this blog