नीरा-भीमा कारखान्यावरती स्वातंत्र्य दिन साजरा
नीरा भीमा कारखान्यावरती स्वातंत्र्य दिन उत्साहात
इंदापूर:प्रतिनिधी दि.15/8/21
शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती देशाचा अमृतमहोत्सवी 75 वा स्वातंत्र्य दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य मिळालेनंतर गेल्या 74 वर्षामध्ये देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे. सहकारामुळे देशाच्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नीरा भीमा कारखान्याची स्थापना केल्यामुळे या परिसराचे नंदनवन झाले आहे. राज्यातील साखर उद्योग सध्या काहीसा अडचणीत असला तरी येत्या काळात अडचणी निश्चितपणे दूर होतील, असा विश्वास यावेळी भाषणात लालासाहेब पवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव वाघमोडे यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांनी केले. ध्वजारोहण प्रसंगी कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, भागवत गोरे, मोहन गुळवे, माणिकराव खाडे, के. एस. खाडे, अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले.
_______________________________
Comments
Post a Comment