लेखिका बबिता काळे यांचा आक्रोश वेदनांचा या पुस्तकाचे बीड येथे प्रकाशन
लेखिका. बबिता काळे
सोलापूर दि 13 प्रतिनिधी:
येथील प्रबुद्ध प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या सौ. बबिता लखन काळे लिखित आक्रोश वेदनांचा पारधी समाजातील समस्येवरील व त्यांनी जीवनातील अनुभवलेल्या घटनेवरील ग्रंथांचे प्रकाशन दै. लोकप्रभा चे संपादक संतोष मानूरकर व महाराष्ट्र राज्य मराठा पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या हस्ते आदिवासी दिनी बीड येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक, परमेश्वर काळे हे होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बिरसा मुंडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. यावेळी ग्रंथाच्या लेखिका सौ. बबिता काळे यांनी थोडक्यात ग्रंथ लिखाण करण्याचे उद्देश काय याबद्दल मनोगत व्यक्त केले.
तर साहित्यिक नामदेव भोसले, ह.भ. प. बावणे महाराज आणि भैरवनाथ भोसले यांनी पुस्तकाविषयी विचार व्यक्त केले.
आक्रोश वेदनांचा या ग्रंथासाठी भारतीय प्रबुद्ध संस्कृतीक चळवळीचे जनक भीम पुत्र टेक्सास गायकवाड यांची प्रस्तावना, असून प्रशासकीय लेखन डॉ.किर्ती पाल गायकवाड यांनी केले आहे.
ग्रंथाचे मुखपृष्ठ सोलापुरातील प्रसिद्ध चित्रकार आनंद आर्ट यांनी तयार केले आहे,या कार्यक्रमास लखन काळे, अजय शिंदे, अर्जुन काळे, वैभव काळे, खंडू काळे, आदेश काळे,ईश्वर काळे, निलेश शिंदे, प्रमोद शिंदे, आदींनी उपस्थिती दाखविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ भोसले यांनी तर सूत्रसंचालन अर्जुन काळे व आभार सुधीर भोसले यांनी मानले.
Comments
Post a Comment